आम्ही चिकन, मासवडी देतोय; तुम्ही मटण अन् आमरस द्या; पण राजकारण करू नका!

0

रुग्णांना विविध सुविधा मिळाव्यात या दृष्टीने बहुतांश ठिकाणी कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधा वरून राजकारण चांगलेच पेटले आहे. स्पर्धा करायचे आहे तर ती चांगल्या कामाची करावी मात्र अशा प्रसंगी राजकीय खोडे घालण्याची प्रथा ही चांगली नाही.

“जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील कोरोना सेंटरमधील रुग्णांसाठी आम्ही दररोज दोन अंडी देतोय, त्यांनी चार द्यावीत. आम्ही चिकन देतोय, त्यांनी मटण द्यावे; आम्ही मासवडी देतोय, त्यांनी आंबरस द्यावा. आम्ही काम करतोय, त्यांनीही करावे; पण उगीच टिकाटिपणी करू नये”. असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल लांडे यांनी मत व्यक्त केलं आहे. तसेच ही राजकरण करायची वेळ नाही असेही त्यांनी या वेळी सांगितले.

रुग्णांना सुविधा मिळावी या हेतूने सोमतवाडी येथे शासकीय कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या वरून राजकारण पेटले असल्याने अमोल लांडे यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.