मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता घेणार सर्वपक्षीय बैठक राज्यात लागणार 3आठवड्यांचा कडक लॉकडाऊन?

0

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली असून,बैठकीत 3 आठवडे लॉकडाऊन लावण्यावर चर्चा होणार आहे.

राज्यात कडक निर्बंध लावूनदेखील कोरोना आटोक्यात येत नाही आहे.परिणामी काही जिल्ह्यात ग्रामीण भागात मृत्यूदर वाढला आहे.बेड उपलब्ध न होण, व्हेंटिलेटर्सची कमतरता या अडचणींबरोबरच राज्यात रेमेडिसिव्हर इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.

नाशिकमध्ये या कारणास्तव रुग्णांचे नातेवाईक संतप्त होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.त्यातच कोविड सेंटरना आग लागण्याच्या गंभीर घटना घडत आहेत आज नागपुरात वेलट्रिट कोविड सेंटरला आग लागल्याने 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.ही आग शुक्रवारी रात्री 8.45 च्या दरम्यान लागली होती.

दरम्यान राज्य सरकार वारंवार गर्दी टाळण्याचे प्रयत्न करत असून त्याला लोक फारस जुमानताना किंवा प्रतिसाद देताना दिसत नाही आहेत.विकेंड लॉकडाऊन असूनही आज दादर मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला आणि खरेदीसाठी झुंबड उडाली.व्यापारीही दुकान बंद ठेवण्याच्या विरोधात आहेत.

याबद्दल संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, राजकारण बाजूला ठेवून निर्णय घेण्याची वेळ आल्याच स्पष्ट केल. कोरोना कोणत्याही आर्थिक स्तरात आढळत आहे, परिणामी सगळ्यांच्याच जीवाचा विचार करण गरजेच असल्याच त्यांनी व्यक्त केल.नांदेडचे आमदार कोरोनान आजच मृत्यू पावलेत त्याविषयी बोलताना त्यांनी दुख व्यक्त केल.

राज्यात लसीची मागणी जास्त असून पुरवठा कमी पडत असल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे.त्यातच रेमेडिसिव्हरचा काळाबाजार होत असल्याचे आरोप होत आहेत.13तारखेला गुढीपाडवा असून येत्या दोन दिवसात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडणार आहे.

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोराळे येथे झालेल्या सभेत 9 जणांना कोरोना झाल्याच समोर आल आहे.परिणामी काही जिल्ह्यात लागणाऱ्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.

कोरोनाची चेन ब्रेक करून आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी ही बैठक तातडीची ठरणार आहे.अन्यथा भविष्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि आरोग्य सुविधा यांच मेळ घालण आरोग्य खात्याला जिकीरीच ठरू शकत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.