“पराभवाची सवय करून घ्या” चंद्रकांत पाटील यांना छगन भुजबळांनी काढला चिमटा!

0

देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील भाजपच्या मातब्बर नेत्यांनी पश्चिम बंगाल मध्ये जाऊन प्रचार केला. निवडणूक जिंकली पाहिजे म्हणून कष्ट घेतले त्या मानाने त्यांना तिथे यश मिळालं नाही. भाजप चा झालेला पराभव हा फार मोठा पराभव आहे. हा पराभव भाजप च्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे.

“तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल”. अशा प्रकारचा धमकी वजा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिला होता. या धमकी वजा इशाऱ्यावर छगन भुजबळांनी चांगलीच चंद्रकांत पाटील यांची फिरकी घेतली आहे. छगन भुजबळ म्हणाले “तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही,” असा टोला लावला. छगन भुजबळांनी ममता बॅनर्जी यांचे केलेलं कौतुक भाजप नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. छगन भुजबळांनी ममता बॅनर्जी यांच्या विजयाचे तोंड भरून कौतुक केलं होते.

पुढे छगन भुजबळ म्हणाले की माझ्या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. वारंवार फटके बसणार आहेत. तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात? असा प्रश्न करत जोरदार चिमटा छगन भुजबळ यांनी काढला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.