
‘छा-छू’ काम आहे, पोलीस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय बांधकामाच्या बाबतीत खूपच बारीक लक्ष असते. एखाद्या इंजिनीयरला समजणार नाही इतके बारकावे बांधकाम विभागातील अजित पवार यांना समजतात. असाच काहीसा किस्सा पुण्यातील पोलिस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा घेताना घडला.
पुणे पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या हस्ते विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी कामाचा आढावा घेतला.
पोलीस मुख्यालयातील कामांचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्या वेळी अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की “गुप्ता मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे ‘छा-छू’ काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?” असा प्रश्न विचार अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ही बोलले.