चंद्रकांत पाटील यांना स्वप्न पाहण्याची सवय – जयंत पाटील

0

जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देत चांगलीच फिरकी घेतली आहे.

सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार पडणार आहे, सरकार पडण्याची घाई आम्हाला नाही. मात्र, त्यांच्यातील भांडणामुळेच हे सरकार पडेल अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या नंतर माध्यमांच्या मध्ये सरकार बद्दल चांगलेच तर्क वितर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की चंद्रकांत पाटील हे नियमीत वेगवेगळी वक्तव्य करत असतात, त्यांना स्वप्न बघण्याचा छंद आहे, त्याबाबत मी काय बोलू, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे असेही ते म्हणाले.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.