
चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकिटाच दिलं नाही!”
शिवसेना आणि भाजप या पक्षामधील विस्तव अजूनही जायला तयार नाही. संधी मिळेल त्यावेळेस दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर चांगलीच टीका करताना दिसून येत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवणाऱ्या भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की “शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे”. यावर शिवसेना नेते खा. प्रतापराव जाधव यांनी उत्तर देताना बावनकुळे यांनी मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीटच दिलं नाही, असा टोला लावला आहे.
प्रतापराव जाधव म्हणाले “शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला हा बावनकुळेंचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कारण निवडणुकीपूर्वी समान जागांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले नव्हते. तर अमित शाह स्वत: मातोश्रीवर आले होते. असं असताना भाजपनं शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उभे केले. खतं तर भाजपनंच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे” असे खा. प्रतापराव जाधव म्हणाले.