चंद्रकांत दादांची सगळी ‘माया’ कुठे आहे ते मला चांगलचं माहित – हसन मुश्रीफ

0

चंद्रकांत पाटील आणि मंत्री. हसन मुश्रीफ यांच्या मध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सध्या दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वर तीन अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्यात आलेले आहेत. याच अब्रूनुकसानीच्या दाव्यावरून चांगलेच राजकीय नाट्य रंगले आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की “हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील”. त्यांच्या या अब्रू नुकसानीच्या दाव्याला मी घाबरत नाही कारण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

या बद्दल बोलत असताना हसन मुश्रीफ म्हणाले की “चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले, तरी त्यांची माया कुठं आहे हे मला माहिती आहे”. अशा केलेल्या हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.