चंद्रकांत पाटील भाजप सोडून शिवसेनेत जाणार असतील, जयंत पाटील यांचे सूतोवाच

0

“चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे भाजपा सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल. कारण शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेलं सूचक वक्तव्य महत्त्वाचं आहे” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी’ असं विधान केलं.त्या विधानावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.

“मला माजी म्हणू नका. मग दुसरा मार्ग काय आजी होण्याचा? शिवसेनेत येऊन मंत्री होण्याचा एक मार्ग आहे. पुढच्या दोन-तीन दिवसात चमत्कार घडेल अस जे त्यांचं म्हणणं आहे, त्यांना मंत्री व्हायचं असेल तर तो चमत्कार इथेच होईल” असे जयंत पाटील म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांवर अन्याय करणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा हे नेते भाजपातून शिवसेनेते जाण्याची शक्यता आहे. असं माझ्यासारख्या कायकर्त्याला वाटत आहे. सरकार स्थिर आहे. मतभेद नाहीत, अडचण नाही. कोणाची तक्रार नाही त्यामुळे बाकीचे प्रश्न उदभवत नाही” असे जंयत पाटील यांनी सांगितले. “भाजपा नेते काय म्हणतात, ते दोन वर्ष म्हणत आहेत, त्यांच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार?” असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.