“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

0

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं महाविकास आघाडी सरकार पडण्याच्याबाबतीत चर्चा होताना दिसून येत आहेत. या गोष्टीला पद्धतशीरपणे खतपाणी घालण्याचे काम विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष करत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमेका वरती सातत्याने कुरघोडी सुरू आहेत. तीनही पक्ष सातत्याने एकमेकावरती टीका करताना दिसून येत आहेत.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या तसेच सातत्याने आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या नाना पटोले यांच्यावरती टीका केली आहे ही टीका करत असताना संजय राऊत सामना मध्ये म्हणाले की नानांचा स्वभाव किती मोकळ्या-ढाकळ्या मनाचा आहे हे सांगताना भाजपमधल्या चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे जसं मनास येईल ते बोलतात तसंच नानांचंही आहे. नाना विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत, असं राऊत म्हणाले. तर हे वर्णन करताना राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना कोपरखळी लगावली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक, असा टोमणा राऊतांनी मारलाय.

संजय राऊत म्हणाले की नाना पटोले हे विदर्भाच्या मातीतील रांगडा गडी आहे मला असेल ते सरळ बोलून टाकतात. भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगड्या बोलीचे आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.