” चंद्रकांत दादा चमत्कारी पुरूष ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत ” संजय राऊतांचा चिमटा

0

भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी एका मुलाखती दरम्यान माध्यमांशी बोलताना ” मलामाजीमंत्री म्हणू नका, एक दोन दिवस थांबा ” अस नमूद केल होत, त्यावर खासदार संजय राऊत यांनी ” भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती.त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, ” असा चिमटा काढला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्मयाची त्यांची वेदना समजू शकतो.मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.

दरम्यान सोनू सूद यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोनू सूद लोकांना मदत करत होते. त्यावेळी खूप वाद झाला. तेव्हा भाजप आम्हाला सांगत होता हा एकटा माणूस कसा काम करत आहे. सरकार काही करत नाही. त्यावेळी सोनू सूदचा राज्यपालांनी सत्कारही केला होता. परंतु, केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात भाग घेतला. तो केजरीवाल सरकारचा ब्रँड अम्बेसेडर झाला. म्हणून तो त्यांचा दुश्मन झाला. त्यानंतरच त्याच्यावर कारवाई सुरू झाली. सोनूच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. आयकरच्या धाडी हा तर रडीचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.