जुन्या आठवणींना उजाळा, सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची ‘मुंबई’ सफर व्हिडिओ होत आहे व्हायरल!

0

शरद पवार यांच्या वरती काही दिवसांपूर्वी दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांनी आपली प्रकृती सावरल्या बरोबरच मुख्यमंत्री सहायता निधीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १ कोटी रुपयांची मदत देण्याचे देण्यासाठी पत्र दिले होते त्याची चांगलीच सोशल मीडियावर चर्चा झाली होती. तसेच त्यांनी शेतकरी, कामगार, व्यावसायिक यांच्या बाबतीत पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. त्यांची प्रकृती स्थिर झाल्या बरोबर त्यांनी कामाला जोमाने सुरुवात केली आहे.

७ मे रोजी सायंकाळी खा.सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्यांनी खा. शरद पवार यांच्या सह एक चेंज म्हणून मुंबई मध्ये ड्राईव्हला आलो असल्याचे सांगितले. तशी त्यांनी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती सुद्धा दिली होती. तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मधील नेमका संवाद काय आहे एकदा पाहू..

नमस्कार रितसर परवानगी घेऊन बाहेर पडलोय… लॉकडाऊन आहे याची जाणीव आहे, जबाबदारी आहे.. मी आणि बाबा चेंज म्हणून ड्राईव्हला आलोय, मुंबईमध्ये..

मुंबई किती बदलली, आपण आलो तेव्हाची आणि आताची मुंबई.. आपण 1971 मध्ये आलो ना… मी आणि आई ऑफिशिअली आलो…

शरद पवार: मी साधारणत: ६२-६३ मध्ये काँग्रेसचे युवक सेक्रेटरी म्हणून आलो.. त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल वर्कर होते. पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते. आता त्याचं नाव काकासाहेब गाडगीळ लेन असं आहे.. आता तिथे काँग्रेसचं टिळक भवन आहे. तिथे आम्ही राहायचो…. आम्ही तिथे ५ वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो… मी काँग्रेस नेते असे बरेच होतो.. आता बदललंय सगळं.

त्यावेळी मुंबईत तो भाग जो आहे.. तो सामान्य लोकांचा होता… तिथे कोकणातील होते, घाटावरचे होते… कोकणी लोक मोठ्या संख्येने होते… सर्व कष्टकऱ्यांचा, कामगारांचा होता.. लालबाग, परळ वगैरे …

एकत्र येऊन सण साजरे करणे.. जसे कोकणात वेगवेगळे सण आहेत, ते साजरे करायचे… तेव्हा घाटावरचे लोक म्हणायचे… आपण सगळे घाटी होतो.. आपल्याला घाटी म्हणायचे..

आपल्याकडे काही लोक इकडे असायचे… मग गावाकडून कोणी कार्यकर्ता, पाहुणा आला की भागातील लोक सगळे जाऊन त्याला चांगलं जेवण वगैरे देणार, त्याला सिनेमा दाखवणार, तो माणूस गावाकडे जाऊन सांगायचा, काय माझी बडदास्त ठेवलेय, सिनेमा दाखवला, जेवण दिलं वगैरे .. ते लोक खुश होऊन जायचे.. गावाकडे सांगायचे आपले लोक कसे चांगले वागतात वगैरे

ती वेगळी मुंबई होती, आताची वेगळी आहे… ते कल्चर वेगळं होतं.. मुख्य म्हणजे इथला सामान्य माणूस गेला.. मराठी माणूस… आता बहुमजली इमारती आल्या.. समाजकारण बदललंय…

अशा आशयाचा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सुप्रिया सुळे यांच्या या लाईव्ह ची चांगलीच चर्चा सगळीकडे सुरू आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.