ट्विटरवर केंद्र सरकार कारवाई करण्याच्या तयारीत !

0

शेतकरी चळवळीसंदर्भात ट्विटर हँडलवर संबंधित सामग्री आणि विवादित हॅशटॅगशी संबंधित सर्व यूआरएल अवरोधित करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारत सरकार आता ट्विटरवर कडक कारवाई करू शकते. केंद्र सरकारने ट्विटर सरकारच्या सूचनेच पालन करीत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही, असं देखील सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाच्या मते, ट्विटरने यूएस कॅपिटल हिल हिंसाचार प्रकरणातील सरकारच्या निर्देशांचे त्वरित पालन केले, परंतु भारत सरकार शेतकऱ्यांचे हत्याकांड करत आहे, अशा आशयाच्या दिशाभूल करणार्‍या आणि अपप्रचार करणाऱ्या ट्विट हटविण्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे आणि आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाढा वाचून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे.

ट्विटर आणि भारत सरकार यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांमुळे बुधवारी केंद्राचे आयटी सचिव आणि ट्विटरच्या वरिष्ठ अधिका-यांच्यात व्हर्च्युअल संवाद झाला. ट्विटरने सरकारी नियमांचे पालन करावे आणि लोकशाही संस्थांचा आदर राखावा अशी सूचना मंत्रालयाने यावेळी दिली. सरकारने म्हटले आहे की कोणत्याही कंपनीला देशात, त्यांचे वैयक्तिक नियम असले तरीही त्यांनी भारतीय संसदेने पारित केलेल्या कायद्यांचे पालन करावे लागेल.

ट्विटरने बुधवारी ५०० हून अधिक खाती निलंबित केली परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याची गरज असल्याचे सांगून “पत्रकार, समाजसेवक आणि नेते” यांच्या खात्यावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. ज्यानंतर सरकारने ट्विटरवर अकाउंटवर त्वरित कारवाई करण्यास उशीर केल्याबद्दल आणि हॅशटॅगने शेतकरी चळवळीविषयी चुकीची माहिती आणि भडकाऊ गोष्टी पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याबद्दल बुधवारी सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ट्विटरला कडक शब्दात सुनावले की त्यांना भारतीय कायद्याचे पालन करावे लागेल. असे करण्यात अपयशी ठरल्यामुळे ट्विटरवर आयटी कायद्याच्या कलम६९अ अन्वये कारवाई केली जाईल, ज्यात तुरुंगवासाची शिक्षा देखील आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम (आयटी अ‍ॅक्ट) अंतर्गत गठित समितीकडून ट्विटरला सूचना देण्यात आल्या असून त्या ४८ तासांच्या आत पाळल्या जाणे अपेक्षित होते पण त्या नियमांचे पालन केले गेले नाही, त्यामुळे सरकार ट्विटरवर भडकले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.