कोरोना औषधांना जीएसटी माफी साठी केंद्राची समिती: अजित पवारांचा समिती मध्ये समावेश.

0

रुग्णांना औषधोपचारा साठी लागणार्या गोष्टींची किंमती फार जास्त आहे. सर्वसामान्य माणसांना उपचार घेणे अवघड जात आहे. तसेच आर्थिक डोलारा सुद्धा कित्येक कुटुंबांचा औषध उपचारांना लागणाऱ्या मोठ्या रकमेमुळे कोसळला आहे. औषधांची किंमत कमी होणे गरजेचे आहे कारण सर्वसामान्य माणसाला सवलतीच्या दरामध्ये औषधे मिळतील. व सर्वांना उपचार घेणे शक्य होईल.

कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’त माफी, सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या ४३ व्या ‘जीएसटी’ परिषदेत केली होती. अजित पवारांच्या या मागणीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय वित्त मंत्रालयाने परिषद झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी देशातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्री अथवा वित्त मंत्र्यांची समिती नेमली आहे.

या समितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदस्य म्हणून निवड करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून जीएसटी माफी सवलत देण्याची कितपत आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन शिफारस अहवाल तयार करण्यात येणार आहे त्यानंतर यावर केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेईल.

Leave A Reply

Your email address will not be published.