केंद्राची रेमेडिसिवरचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना धमकी, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

0

मुंबई : राज्यात ऑक्सिजन अभावी परिस्थिती गंभीर झाली असून, काल एका दिवसात ६३ हजार ७२९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. परिणामी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.

तसेच राज्यात अनेक ठिकाणी रेमेडीसीवर इंजेक्शन्स, बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसून येत आहेत.

दरम्यान, करोना गुणकारक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर राज्यात जाणवत असून, रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना देखील समोर येत आहे. यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळत आहे.

यातच आज नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका, असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

तसेच जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली, तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यांच्या या गंभीर आरोपांचे भाजपने खंडण केले असून, आता यावरून राज्यात पुन्हा नवीन राजकारण रंगू लागलं आहे. मात्र या नेत्यांच्या राजकारणात सामन्य जनतेचा हकनाक बळी जाता आहे.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.