ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकनिया यांची सुटका,देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप

0

राज्यात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी असलेल्या रेमेडिसेव्हरवरून मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य रंगलेल आहे.सर्वसामान्य जनता कोरोना साथीन होरपळत आहे,रुग्णांना आरोग्याच्या अनेक सोयी वेळेवर उपलब्ध होत नाहीत अशी अवस्था निर्माण झाली आहे.रुग्णांबरोबरच त्यांचे नातेवाईकही रुग्णाला बेड मिळावा,आॅक्सीजन,रेमेडिसेव्हर मिळाव यासाठी धावपळ करत आहेत.राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर रेमेडिसेव्हरचा तुटवडा जाणवत असून महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी आरोप प्रत्यारोपाची फैरी झडलेली आहे.

पुण्यात तसेच नाशिकमध्ये रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरून रेमेडिसेव्हरसाठी आंदोलन करत होते.काही ठिकाणी रेमेडिसेव्हर चढ्या दरान विकल जात होत.अशाप्रकारची अंदाधुंद परिस्थिती राज्यात काही दिवसांपासून सुरू असून महाविकास आघाडीने भाजपवर टिका करत भाजपन फार्मा कंपनींना महाराष्ट्राला रेमेडिसेव्हर देऊ नका अस धमकावलय असा आरोप केला तर भाजपनही याच प्रकारचा आरोप महाविकास आघाडीवर केला.

दरम्यान ब्रुक फार्माचे राजेश डोकनिया यांची या संदर्भात अटक झाली,परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली.तरीदेखील त्यांची चौकशी होणार हे निश्चित झाल आहे.प्रविण दरेकर यांनी आम्हाला राजकारण करायच नाही आहे अस सांगत सारवासारव केली.रेमेडिसेव्हर या आजारात अत्यावश्यक बाब असून त्याचा पूरवठा योग्य व्हावा तसच त्यांचा दरही सगळीकडे एकच असावा याची खबरदारी राज्यशासनान घेण गरजेच होत,राजेश टोपेंनी तस केल्याच जाहीरही केल परंतु ते तोंडदेखल ठरल.

सर्वसामान्य जनतेचा जीव टांगणीला लागला असताना राजकीय पक्षांनी अशाप्रकारे जनतेला वेठीस धरण टिकास्पद आहे.समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा हे भान अशाकाळी राजकीय नेत्यांनी ठेवण आवश्यक असून काहीकाळ तरी राजकारण बाजूला ठेवत जनतेचे अश्रु पुसावेत एवढीच माफक इच्छा तुमच्या जनतेची आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.