
#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू अभिनेत्री
कपूर घराण्याची चित्रपट परंपरा जुनी असून पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ती चालत आली आहे. राज कपूर हे त्यांचे चिरंजीव त्यांनीही सुपरस्टार अभिनेता ते उत्तम दिग्दर्शक असा प्रवास केलेला होता त्यांचेच चिरंजीव रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची मुलगी म्हणजे करिना कपूर खान होय.
करिना कपूरने अनेक सुपर हिट चित्रपट दिलेले असून कभी खुषी कभी गम, बजरंगी भाईजान याचा प्रामुख्यान उल्लेख करावा लागेल. करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले व तिला दोन मुले झाली. नुकतच दुसर्या मुलाच्या डिलेव्हरीनंतर तिच वजन वाढल होत, यावर तिनी आता फिटनेस चालू केला असून त्याचे अपडेट ती सोशल मिडीयावर शेअर करत असते.
करिना कपूरवर सध्या नेटकरी नाराज असून सोशल मिडीयावर #बॉयकॉट करिना अशी मोहीम चालू झाली आहे. त्याच कारण अस आहे की, रामायण नावाच्या एका येऊ घातलेल्या चित्रपटात करिनाला माता सीतेची भूमिका आॅफर झाली असून त्यासाठी करिनाने १२ कोटी रूपये मानधन मागितल आहे. एरवी ८ ते ९ कोटी रूपये घेणारी करिना एवढ मानधन घेत असल्याने तिच्यावर टिका होत आहे. दुसर कारण म्हणजे अनेक नेटकर्यांनी या भूमिकेसाठी हिंदू अभिनेत्रीच हवी अशी मागणी केली आहे.यातून करिनावर बॉयकॉट मोहीम राबवली जात आहे.
या चित्रपटात आता अभिनेत्री बदलणार का? याबाबत अजूनही अधिकृत सूत्रांनी माहिती दिली नसून लवकरच त्याबद्दल उदघोषणा करण्यात येईल.