
इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जमशेदपूर जवळील बागू बागुनाधू भागातील रहिवासी असणाऱ्या किन्नान स्टेडियमनजीक ती रविवारी आंबे विक्री करत होती. तिच्या या संघर्षाची गाथा एका पत्रकाराने मांडली. तिच्या घेतलेल्या मुलाखती मध्ये तिने सांगितले की मोबाईल नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण थांबले आहे. पण आंबे विकून पाच हजार रुपये गोळा होताच अॅण्ड्रॉईड मोबाईल फोन विकत घेणार असल्याचे सांगितले.
तिच्या या कामाचे मोल लक्षात घेत, आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुंबई मधील एका उद्योजकाने एक डझन अंबे चक्क एक लाख 20 हजार रुपयांना विकत घेतले. व्हॅल्युबल एज्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मौल्यवान मदतीमुळे ऑनलाइन शिक्षण मिळण्यासाठी अॅण्ड्रॉईड फोन विकत घेण्याचे तिचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले आहे.
तिची संघर्ष कहाणी देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. उद्योगपती अमेय हेटे यांनी केवळ तिच्याबद्दल सद्भावना व्यक्त न करता चक्क तिच्या टोपलीतील एक आंबा दहा हजार रुपये या दराने डझनभर आंबे चक्क एक लाख वीस हजार रुपयांना विकत घेतले. तिच्या वडिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले आहेत. कोरडी अस्था न दाखवता त्यांनी केलेली ही मदत उल्लेखनीय आहे!