बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील पाहतो मराठी चित्रपट

0

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. खिलाडी हे टायटल असणार्या अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. कॉमेडी, फायटिंग, रोमँटिक, कौटुंबिक या सर्व जॉनरमध्ये अक्षय कुमारने काम केलेले आहे. अक्षय कुमारने चित्रपट तिकीटबारीवर चांगले चालतात. उत्तम फिटनेस ठेवणारा अक्षय कुमार काटेकोर जीवनशैली पाळतो. अक्षय कुमारने नुकतच सामाजिक ऋण फेडत कोरोनासाठी भरघोस आर्थिक मदत देऊ केली आहे. असा नेहमी चर्चेत असणारा अक्षय जुने मराठी चित्रपट आवर्जून बघतो.

अक्षय कुमारने एका मुलाखतीमध्ये सांगितल की, त्याला मराठी चित्रपट बघायला आवडतात. त्यान सांगितल मला पूर्वीपासूनच मराठी येत, मला मराठी बोललेल समजत तसेच बोलताही येत. मराठी चित्रपट दर्जेदार असतात. मराठी कलाकार मेहनती असेन उत्तम अॅक्टींग करतात. ” मी मराठी चित्रपट इंग्रजी सबटायटल्स शिवाय बघू शकतो. मी स्वता मराठी चित्रपट बनवले असून मी रिलीज उदघाटनालाही जातो.

अक्षय कुमारचे हे मराठी चित्रपटांविषयी असलेल मत बघून मराठी प्रेक्षकांची मान अभिमानाने उंचावली जाणार यात शंका नाही. मराठी चित्रपट दर्जेदार असून कलाकार मेहनती आहेत हे अक्षयने नमूद केल्याने मराठी दिग्दर्शक तसेच कलाकार यांना हुरूप आला असून त्यांच्या कामाची दखल बॉलीवूड स्टार घेतोय हेही नसे थोडके.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.