काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे – रितेश देशमुख

0

देशात कोरोनाने मोठा कहर केला आहे. जनमानसात या आजारामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. लोकांना इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड मिळत नाही. अशाच परिस्थिती मध्ये काही दलालांनी राज्यातील आणि देशातील रेमडेसिवीर लसींचा तुटवडा निर्माण झालेला पाहता काळाबाजार सुरू केला आहे. अशा परिस्थिती मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणजे उत्पन्नाचे साधन काही लोकांनां वाटत आहे, अशा शब्दात अभिनेता रितेश देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे.

अशाच गोष्टींची दखल घेत बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपला संताप तीव्र शब्दांत सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. ट्विटर वरती रितेश देशमुख म्हणाले की ‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’, असे ट्वीट रितेशने ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विट चे लोक कौतुक करत आहेत. कारण अशा निर्दयी लोकांना परिस्थितीचे गांभीर्य वाटत नाही त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.