महिला सरपंचाला भाजपच्या कार्यकर्त्याची मारहाण

0

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून महिला सरपंचावरील मारहाणीविरोधात आवाज उठवला आहे. ही मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि गुंडशाहीचा धुडगूस थांबवण्यात यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. ट्विटरवर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून महिला सरपंचाने त्या व्हिडीओमधून गंभीर आरोप केले आहेत.भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या गुंडांनी आपल्याला लाथ मारली व शिवीगाळ केली, असे महिला सरपंचाने व्हिडीओमध्ये म्हटले असून आरोपींविरोधात कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

सदर घटना अहमदनगरमध्ये घडली असून अत्यंत संतापजनक असल्याच समोर येत आहे. जिल्ह्यातील उक्कडगावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण व अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.राणी काथोरे या उक्कडगावच्या सरपंच आहेत.त्यांनी बुधवारी ८ सप्टेंबरला तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिला अस त्यांच म्हणण आहे. गावात ग्रामसभा चालू असताना “” मी तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडला. विरोधी पक्षाला ही निवड मान्य नव्हती. त्यांनी आरडाओरडा केला. मी सभा तहकूब करून त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. बहुमताने आपण अध्यक्ष निवडू, असं सांगितलं. पण तेही त्यांना मान्य झालं नाही.” अस त्यांनी सांगितल.

त्यानंतर त्यांनी जास्त आरडाओरडा केला. त्यानंतर मी कार्यालयाकडे निघाले त्यावेळी भाजपच्या गुंडांनी पाठीमागून लाथ मारली, असा आरोप राणी कथोरे यांनी केला आहे. नंतर पोलिस ठाण्यातही त्यांची दखल घेतली गेली नाही. तिथे त्यांना २ ते ४ तास बसवून ठेवण्यात आले, असाही दावा कथोरे यांनी केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.