फोन टॅपिंग प्रकरण भाजपला भोवणार?; उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

0

राजकीय हेतूने प्रेरित होऊन राज्यातील महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले. हे प्रकरण भाजपच्या काळात झालेलं आहे, आजच्या अधिवेशनामध्ये यावरती चांगलीच चर्चा झाली. फोन टॅपिंग प्रकरण भारतीय जनता पक्षाला चांगलेच भवणार आहे अशी शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हे प्रकरण 2016 17 मध्ये राज्यातील आमदार-खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते समाज विघातक कृत्यावर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅप करण्यात आले होते. यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.

नाना पटोले म्हणाले की अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. माझ्या नंबरला अमजद खान असे मुस्लिम नाव देण्यात आले यामागील हेतू हा मुस्लिम धर्माचे नाव घेऊन हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून राजकारण करण्याचा होता काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहातच अनिल देशमुख करु, भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असं पटोले म्हणाले. तर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली.

नाना पटोले यांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असेही ते म्हणाले. उद्याच या प्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहितीही घेऊ, असे वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.