
भाजपनं पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलं -राऊतांचा हल्लाबोल!
तौते चक्रीवादळाच्या मदती वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलच राजकारण रंगले आहे. देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरती टीका केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून मदत मिळवून आणावी असे प्रत्युत्तर सत्ताधारी पक्षाने दिले होते. काही दिवसांपूर्वी तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी गुजरातला मोठी मदत दिली मात्र महाराष्ट्राला केंद्राकडून काही मिळाले नाही.
भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून नारायण राणे यांचा उल्लेख होतो. भाजपनं पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत यांनी पत्रकारपरिषदेत नारायण राणे आणि भाजप यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
नारायण राणे यांना कोकणातील नेते म्हणून ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी चक्रीवादळाच्या मदती वरून राज्य सरकारवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. राऊत म्हणाले की, भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रूग्णालयातच आरटीपीसीआरसाठी जादा पैसे घेतले जात आहे. भूखंड हडप करणारे म्हणजे नारायण राणे. त्यांचा अनुभव हा भ्रष्टाचारातून आलेला आहे. इतकेच नव्हे तर अजून नारायण राणे कोकणात पण गेले नाहीत अशी त्यांनी टीका केली.