
चार अपत्यं असणारा भाजपा खासदार मांडणार ‘लोकसंख्या नियंत्रण विधेयक’!
राजकारणामध्ये काही गोष्टी पाहिल्या तर निश्चित हसायला येते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेश येथील लोकसंख्या नियंत्रण विधेयक हे चार अपत्य असणारी व्यक्ती मांडणार असल्याने चांगलीच मजेशीर चर्चा देशभरामध्ये रंगली आहे. या विधेयकावर सहा ऑगस्ट रोजी राज्यसभेत चर्चा होणार आहे. मात्र एका वेगळ्याच मुद्द्यामुळे रवी किशन यांना ट्रोल केले जात आहे.
रवी किशन यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्यं आहेत. रवी किशन यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रकात ही माहिती नमूद केली आहे. त्यामुळे रवी किशन यांना मोठ्याप्रमाणात ट्रोल केले जात आहे. रवी किशन संसदेत लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार असल्याची माहिती समोर येताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. चार अपत्ये असणारे व्यक्ती लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार हीच गोष्ट हास्यास्पद आहे यावरून राजकीय वातावरणामध्ये चांगलीच चर्चा रंगायला लागली आहे. त्यांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडावं हे म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे.