मोदी सरकारला घरचा आहेर खासदार सुब्रमण्यम स्वामींनी काढले भाजपच्या अच्छे दिनचे वाभाडे

0

सलग दोनवेळा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी निवडून आले आहेत.देशातील जनतेने भाजपला विश्वासान निवडून दिले आहे,पण या विश्वासावर भाजपचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत टीका केली आहे.यात त्यांनी मोदी सरकारला लोकशाहीचे स्तंभ समजावतानाच भाजपची कान उघडणी केली आहे.सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत.

सुब्रमण्यम स्वामी ट्विटमध्ये म्हणतात, लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ आहेत.

1. माध्यम – जे निर्भयपणे सरकारला प्रश्न विचारू शकतात.

2. न्यायव्यवस्था – जी घटनेचे रक्षण करते.

3. खासदार, आमदार – जे लोक निवडून देतात.

4. सरकारी एक्झिक्युटिव्ह जे लोकांचा अजेंडा ठेवतात.

या चार स्तभांची जागतिक अवस्था त्यांनी स्पष्ट केली आहे.

1. सध्या भारतातील माध्यमांचा नंबर 180 पैकी 142 वा लागतो.

2. न्यायव्यवस्थेचा नंबर 128 पैकी 69 वा लागतो.

3. भाजपन जगातल्या कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त एम एल ए आणले आहेत.

4. भारताचा उत्पन्नाच्या बाबतीतला नंबर 193 पैकी 148 वा लागतो.

भारतीय सामाजिक, आर्थिक, संरक्षण, न्यायव्यवस्था या सर्वच क्षेत्राचे वाभाडे जागतिक आकडेवारी देत सुब्रमण्यम स्वामींनी काढले आहेत.इतकच नाही तर भुकेकंगालपणातही भारताचा नंबर 107 पैकी 94 वा लागतो हेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केल आहे.45 वर्षांपेक्षा जास्त बेरोजगारी, कमजोर रुपया याबरोबरच पेट्रोलवरील कर जगात सर्वात जास्त भारतात आहेत असही त्यांनी स्पष्ट केलय, तसेच सीमा सुरक्षाही अस्वस्थ असल्याच त्यांनी मांडल आहे.एकूणच सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारचा लेखाजोखा मांडताना, मोदी सरकारने सखोलपणे लोकशाहीची,अर्थव्यवस्थेची आणि सीमेची तडजोड केली आहे अस ट्विट केल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.