भाजप आमदारांचा धुडगूस, सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ आणि आई बहिणीवरून शिव्या, १२ आमदारांचे १ वर्ष निलंबन!

0

आज अधिवेशन पहिला दिवस या पहिल्या दिवशी जो काही गोंधळ झाला तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राज्याच्या पवित्र सभागृहांमध्ये केल्यानंतर अशा प्रकारची धक्काबुक्की करत असतील लांच्छनास्पद शिव्या देत असतील तर हे दुर्दैवी आहे.

ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. एवढ्यावरच न थांबता प्रकरण धक्काबुक्की पर्यंत गेल्याचा दावा सत्ताधारी लोकांनी केला आहे. सोबतच अध्यक्षांचा माईकही ओढला. धक्काबुक्की वर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून ओबीसी च्या राजकीय अरक्षणावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. आज ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डेटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला.या विरोधात विरोधक आक्रमक झाले. मागासवर्गीय आयोग नेमून तो डाटा राज्य सरकारने मिळवावा असं म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

अधिवेशनाचा आजचा दिवस महाराष्ट्रासाठी लाजिरवाना ठरला. आज सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील या पवित्र सभागृहामध्ये जर अशा प्रकारची शिवीगाळ होत असेल तर ही गोष्ट लांच्छनास्पद आहे आमदारांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे कारण महाराष्ट्रातील जनतेचे लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकांकडून गावगुंडांची भाषा अजिबात अपेक्षित नाही हे मात्र नक्कीच.

विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते, असं सांगतानाच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतिला हे शोभणारं नाही. महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं, अशा शब्दात तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी विरोधकांचे कान उपटले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.