भाजप “राजकीय ऑक्सिजन” मिळवण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करत आहे – आ. रोहित पवार

0

देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्या साठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. महाराष्ट्रात सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा कसा भरून काढता येईल या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे.

यावर आज आ. रोहित पवार यांनी यांनी एक ट्विटरच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे. “देशभरात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असताना त्याकडं दुर्लक्ष करत भाजप मात्र #CBI #ED यांसारख्या सरकारी संस्थांना हाताशी धरुन आपला गमावलेला महाराष्ट्राचा ‘राजकीय ऑक्सिजन’ मिळवण्याचा प्रयत्न करतंय. त्यांचे नेते बोलतात आणि काही दिवसांतच तशी कारवाई होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. राज्यातील सत्ता गेल्याच्या दुःखातून ते अजूनही सावरले नाहीत.

पण त्यांना माझी विनंती आहे, की आज लोकांना #Oxygen, #Remdesivir, #vaccine मिळत नसल्याने लोक अडचणीत आहेत. त्यामुळं स्वतःच्या राजकीय दुःखाकडं लक्ष न देता अडचणीतील जनतेचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा, ते तुमचं कर्तव्य आहे.”

अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी जनतेसाठी काम करावं असे आवाहन केले आहे. कर्तव्याची जाणीव या ट्विट मधून त्यांनी करून दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.