भाजप महाराष्ट्रात सत्तेत येण्याचं स्वप्न बघतंय, त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही: नवाब मलिक

0

महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. भाजप नेते अजूनही सत्ता स्थापनेसाठी उतावळे झाले आहेत. इकडे महाविकास आघाडी सरकार मध्ये प्रत्येक पक्ष सद्य परिस्थिती मध्ये तरी एकला चलो रे च्या भूमिके मध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थिती मध्ये शरद पवार साहेब यांनी उद्या काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. निश्चितच देशामध्ये भाजप विरहित आघाडी करण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. विरोधी पक्षांची मूठ बांधण्याचा प्रयत्न पवार यांच्याकडून केला जातोय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. या बैठकीमध्ये आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांच्यासह इतर काही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

राजकीय रणनितिकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पहिल्या भेटीच्या नंतर देशातील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आजही शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या मध्ये दिल्ली मध्ये भेट संपन्न झाली.

या बद्दल बोलत असताना नवाब मलिक म्हणाले की निश्चितच त्यामध्ये काही चर्चा झाली असू शकते .पण ही भेट राजकारणाच्या संदर्भात असेल असं वाटत नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात भाजप सत्तेत येण्याची स्वप्न बघत आहे. मात्र, हे स्वप्न पूर्ण होणार नाही. महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करत आहे. या सरकारला कुठलीही अडचण होणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.