खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपकडून चिडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर; जयंत पाटलांचा आरोप

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणा लागली आहे. देशभरामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेची यंत्रणेचा वापर हा राजकीय दृष्ट्या केला जातो आहे. अशी टीका देशभरामध्ये केली जात आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पूर्व निवासी असणारे एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. सोबतच एकनाथ खडसे यांच्या कन्येची सुद्धा चौकशी केली जात आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय दृष्ट्या एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करत आहे. याच हेतूने भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने एकनाथ खडसे यांना अडकवत आहे. खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. मात्र राजकीय कुभांड रचवून खडसेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे जयंत पाटील म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.