‘भाजप ही वॉशिंग मशीन इथे डाकू पण साधू होतात’; राष्ट्रवादीचा टोला!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलीच भारतीय जनता पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. महाराष्ट्रामधील सत्तास्थापनेच्या मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला वेळोवेळी चांगलेच आवाहन देत आहे. संधी मिळताच जोरदार टीकास्त्र डागले जात आहे या मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नवाब मलिक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी फळी चांगलीच भारतीय जनता पक्षाला सळो कि पळो करुन सोडत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. “भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली आहे. इथे डाकू पण साधू होवू शकतो” असा जबरदस्त टोला त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषेद घेतली यावेळी ते बोलत होते.

या वेळी मलिक बोलताना म्हणाले कि, ‘नारायण राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या परळ येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यावर भाजपच्या लोकांनी व्हायरल केला होता. त्याचपध्दतीने बंगालमध्ये भाजपने लोक घेतले होते.
म्हणजे ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांच्या दबावाखाली आमच्या पक्षात या अशी परिस्थिती भाजप निर्माण करत आहे. त्यांच्या पक्षात गेल्यावर चौकशा बंद होतात. ही सत्य परिस्थिती आहे. नितीन गडकरीही वाल्या कोळयाचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होते” या सर्व गोष्टींची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करून दिली.

तसेच नवाब मलिक म्हणाले की “आमचे नेते किंवा कार्यकर्ता अशा नोटीसीला आणि कारवाईला घाबरणार नाही” असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.