भाजप फ्रॉड पार्टी आहे, पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्ते मागत आहेत जनतेची माफी!

0

पश्चिम बंगाल मधील निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडलल्या. ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळवत भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव केला. भाजपचे देशातील प्रमुख नेते बंगाल मध्ये ठान मांडून बसले होते.

भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते परत आले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या जबरदस्त बंगालमध्ये असलेल्या राजकीय पकडीची चर्चा देशभरामध्ये होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते गावोगावी फिरून प्रचार करताना दिसत आहेत मात्र हा प्रचार थोडा गमतीदार आहे. “भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत आहेत”.

बीरभूम जिल्ह्यातल्या लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी ही माफी मागायला सुरुवात केली आहे. या सार्वजनिक माफिनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवलं आणि धमकावलं असणार आहे. असा आरोप भाजपाने केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.