
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात भाजपला खिंडार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तालुक्यात भाजपला खिंडार पडले आहे. राज्यातील भाजपची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. देशभरातून भाजपच्या विरोधात जनमत तयार व्हायला लागले आहे. महागाई, बेरोजगारी, कोविड चे संकट या मुळे लोक मोठ्या संख्येने नाराज आहेत.
भाजप विरोधात जनमत तयार होत असलेले लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यामधील भाजपच्या एकमेव आकुर्डे मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजप साठी हा मोठा धक्का आहे.
हा प्रवेश सोहळा शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्या वेळी त्यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख खासदार संजय मंडलिक व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. हा पराभव म्हणजे भाजपच्या जिव्हारी लागेल हे मात्र नक्की आहे!