नाशिकमध्ये डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात आॅक्सीजन टाकी बसवण्याचा ठेका दिला होता भाजपन,महापालिकेत सत्ताही भाजपची

0

नाशिकमध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील आक्सीजनच्या टाकीला गळती लागल्याने या ठिकाणी अॅडमिट असलेल्या आॅक्सीजन लावलेल्या रुग्णांचा आॅक्सीजनच्या कमतरतेने मृत्यू झाला.डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात १५० बेड कोविड रुग्णांसाठी विलग ठेवण्यात आलेले आहेत.

रुग्णालयात १५७ रुग्ण भरती करून घेतले गेले होते,त्यात १११ आक्सीजन बेडचे रुग्ण, १५ व्हेंटिलेटर्स रुग्ण तर ३१ गंभीर रुग्ण भरती होते.दुपारी १२.३०च्या सुमारास टाकीला गळती लागली परिणामी गंभीर रुग्णांपैकी२२ जणांचा मृत्यू आॅक्सीजनच्या कमतरतेने झाला.घटनास्थळी दुरुस्तीचा प्रयत्न केला गेला मात्र तो २२ जणांचे प्राण वाचवू शकला नाही.

भाजपन या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली असून घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.वास्तवात मात्र आक्सीजनची ही टाकी बसवण्याचा ठेका न्यू बिटको या संस्थेला भाजपनच दिलेला होता कारण महापालिकेत सत्ता भाजपचीच आहे,तसेच या रुग्णालयाचे व्यवस्थापन महापालिकाच बघते.अस असूनदेखील बिटकोचा टेक्निशियन घटनास्थळी हजर नव्हता.भाजपन मात्र आघाडी सरकारच्या नावान खडे फोडले आहेत

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.