भाजपा सरकार जनतेची थट्टा करते आहे! जयंत पाटलांची टीका

0

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून छोट्या बचतींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयात मोठा बदल केल्याचं आज (1 एप्रिल) जाहीर केलं.

कालच्या निर्णयानुसार बचत खात्यातील रकमेवरील व्याजदर 4 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर करण्यात आला होता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफवरील वार्षिक व्याजदर 7.1 टक्क्यांवरून 6.4 टक्के करण्यात आला होता. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला निर्णय मागे घेतला असून हे व्याजदर कपातीचे पत्रक नजरचुकीने निघाले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. यावरून विरोधी पक्षाने निर्मला सीतारामन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

‘निवडणुकीला घाबरून मोदी शहा निर्मला सरकारने आपल्या गरीब आणि सर्वसामान्यांच्या लहान बचतीच्या व्याजदराचा निर्णय बदलला. धन्यवाद. परंतु निर्मला जी देखील आश्वासन देतात की निवडणुका झाल्या तरी आपण पुन्हा व्याज दर कमी करणार नाही’ अशी टीका सिंह यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकार व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्रसरकारने थट्टा केली आहे असा थेट आरोपही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.