बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही – नाना पटोले

0

महाराष्ट्रात भलेही काँग्रेस स्वबळाचा नारा देत असेल मात्र सरकार म्हणून शिवसेनेच्या मागे काँग्रेसचा हात आहे हे मात्र निश्चित. महाराष्ट्रात तीनही पक्षात कुरबुर सुरू असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळतात; मात्र तीनही पक्षाचे महाराष्ट्रातील सरकारच्या बाबतीत एकमत निश्चित आहे हे नाना पटोले यांच्या या स्टेटमेंट वरून दिसून येते.

महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष वाढला, आज शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे. हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहावत नसून त्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजपवर टीका केली आहे.

मागील सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेना आणि भाजप यांच्या मधील कलहातील विस्तव जात नव्हता. शिवसेनेला पाडण्यासाठी विरोधी उमेदवारांना भाजप ने अर्थी मदत सुद्धा केली होती अशी अजूनही चर्चा ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याने सेना भाजप मध्ये इतकं काही अजूनही आलबेल असल्याचे दिसून येत आहे.

विदर्भ दौऱ्यावर असताना नाना पटोले म्हणाले की. “सत्तेपासून वंचित राहिल्याने केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम मागील दीड वर्ष भाजप पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करून आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत; परंतु भाजपचे सत्तेत येण्याचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे”. अशा आशयाची त्यांनी टीका सुद्धा केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.