पूजा चव्हाण प्रकरणात चौकशी करण्याची भाजपाची मागणी

0

महाराष्ट्र भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरूद्ध टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की संजय राठोड पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केले असून याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात पूजाचे कुटुंबीय तक्रार देत नसतील तर पोलिसांनी स्वत: सुओ मोटो नोंदवून कारवाई करावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की केवळ भाषणांमध्येच महिलांचे हक्क आणि जीवनाचे रक्षण होऊ नये. ही वस्तुस्थिती दिसली पाहिजे.

पुणे शहरातील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण यांनी फेब्रुवारीत रात्री इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजा पुण्यात तिच्या भावासोबत स्पोकन इंग्लिश शिकत होती. पूजा आत्महत्या प्रकरणाशी मंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची चर्चा असून आता या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.

मूळ बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असलेली पूजा पुण्याला शिक्षणासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्याच्या हडपसर भागात राहत होती. रविवारी मध्यरात्री (पहाटे एकच्या सुमारास) पूजाने सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हॉस्पिटलमध्ये जाताना पूजाचा मृत्यू झाला. ती महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क नावाच्या सोसायटीत राहत होती.

आत्महत्येच्या दुसर्‍या दिवसापासून ही घटना सोशल मीडियावर चर्चेत असून याचा सरळ संबंध विदर्भातील मंत्री संजय राठोड यांच्याशी जोडला जाऊ लागला आहे. प्रेम प्रकरणातून पूजाने तिचे आयुष्य संपवले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, पोलिसांकडून पूजा चव्हाण यांच्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजा आत्महत्येप्रकरणी राज्याचे डीजीपी हेमंत नगराळे यांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की या प्रकरणातील अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्याची चौकशी करणे फार महत्वाचे आहे. याशिवाय या आत्महत्येमध्ये महाराष्ट्रातील मंत्री संजय राठोड यांचे नावही जोडले जात आहे. याचीही तपासणी करणे आवश्यक आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की या ऑडियो क्लिपमध्ये ज्या व्यक्तीचा आवाज आहे, तिचा शोध घेतला जावा आणि ते कुठल्या संदर्भात चर्चा करताय हे देखील बघण्यात यावे. पूजाने कुठल्या कारणाने आत्महत्या केली, तिच्यावर दबाव होता का? असे अनेक प्रश्न असून याची चौकशी व्हावी, असे फडणवीस म्हणाले आहेत.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.