भाजप नगरसेवकाची महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी उर्मट वागणूक – रुपाली चाकणकर आक्रमक

0

पुणे महानगर पालिकेच्या मध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. या ठिकाणी भाजप नगरसेवक महिला अधिकाऱ्यांशी उर्मट वर्तन करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या उर्मट वर्तनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

पुणे महानगर पालिकेत जवळपास १०० नगरसेवक भाजप चे आहेत. या ठिकाणी भाजप ची एक हाती सत्ता आहे. मात्र १०० नगरसेवक हे १०० कौरवांच्या सारखे आहेत. त्यांच्यातील नगरसेवक धनराज घोगरे हे ‘माझ्या प्रभागामध्ये लस केंद्र कधी चालू करणार’ म्हणून एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याशी उर्मटपणे वागून त्यांच्या अंगावर धावून जातात हा प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारचे ट्विट हे रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या या अशा महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात एक आचारसंहिता आणि नियमावली तयार करून त्यांना योग्य ते संरक्षण पुरवावे याबतीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आक्रमक भूमिका घेत आज पोलीस आयुक्त यांना भेटून निवेदन दिले आहे. सोबतच महिला पदाधिकारी त्यांच्या सोबत होत्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.