भाजपच्या नगरसेवकाने परस्पर विकली सरकारी जागा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

0

भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवडचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप लांडगेंवर आहे. लांडगे यांच्यासह एका जमीन खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे., तर दुसऱ्या एकाचा शोध पोलीस घेत आहेत.

बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर जमिनींचा व्यवहार करण्यात आला आहे. लांडगे हे जमिनीचे मूळ मालक नाहीत तरीही त्यांनी बनावट कागदपत्रांच्या जोरावर 15 लाख 80 हजार रुपये त्यांनी बनावट कागदपत्रांच्या जोरावर उकळले आहेत. लांडगे स्थायी समितीचे माजी सदस्य, शहर सुधारणा समितीचे माजी होते. तर सध्या ते महापालिकेच्या क प्रभागाचे अध्यक्ष आहेत.

लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इंद्रायणीनगर येथील जागा शर्मा आणि ठाकूरला १५ लाख ८० हजार रुपयांना विकली आहे. जागेवर अतिक्रमण करुन शर्मा आणि ठाकूर यांनी १८७२ चौ. फुट बांधकाम केले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळकर कर पावती आणि वीज कनेक्शनही घेतले आहे.

भाजपच्या या नगरसेवकाचा हा केलेला गुन्हा हा मोठा गंभीर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कराची पावती असेल तसेच वीज कनेक्शन सुद्धा त्यांनी घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.