भाजप आणि संघ महिलांना दडपण्याचे काम करतो.राहुल गांधींची बोचरी टिका

0

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर जोरदार टिका केली. जेव्हा आपण महात्मा गांधींचा फोटो पाहता, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला २ ते ३ महिला दिसतील. याउलट, आपण कधी मोहन भागवत यांचा एखाद्या महिलेसोबत फोटो पाहिला आहे का? असा सवाल करत राहुल गांधी यांनी भाजप आणि संघ महिलांना दडपण्याचे काम करतो आणि आमचा पक्ष त्यांना व्यासपीठ देत असल्याचे सांगितले.

भाजप सरकारने लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढले आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे यांसारखी समाजविरोधी धोरणे राबवून या सरकारने लक्ष्मीची संपूर्ण शक्ती आपल्या चार-पाच लोकांच्या हाती सोपविली असल्याचे राहुल गांधी म्हणाले.कॉँग्रेस आणि भाजपची विचारधारा खूपच भिन्न आहे. काँग्रेसने एका महिलेला देशाचे पंतप्रधान बनवले होते. पण भाजप सरकारने लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढले आहे. भाजप आणि संघ महिलांना पुढे येऊ देत नाही, अशी बोचरी टीका कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.

भाजपा आणि संघाचे लोक स्वताचा पक्ष हिंदूंचा असल्याचा दावा करतात. मात्र, गेल्या १०० ते २०० वर्षांत महात्मा गांधी ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांनी हिंदू धर्म समजून घेतला आणि तो पाळला. तर मग गोडसेने त्यांची हत्या का केली? आम्ही केवळ गांधींनी पाळलेला हिंदू धर्म ओळखतो. त्यामुळे भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीशी कॉँग्रेस कधीही तडजोड करणार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.