
राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहावं – आ. रोहित पवार
राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहावं - आ. रोहित पवार
तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना चांगला तडाखा बसला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे राज्य सरकार हे नुकसानग्रस्तांना मदत करेलच. मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. ते बारामतीत बोलत होते.
तसेच आमदार रोहित पवार यांनी देशात उद्भवलेल्या लसीचा तुटवडा वरती भाष्य केले आहे केंद्र सरकारच्या मालकीची तमिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे या कंपनीची आहे. या कंपनी सोबत केंद्र आणि राज्य सरकार ने समन्वय साधून कंपनी सुरू करावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणीस यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते याधर्तीवर आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिण्याचे आवाहन केले आहे.