
वाढदिवस तुमचा व्हायचा आणि वाट आमची लागायची – अजितदादा पवार
अजितदादा पवार म्हणजे फारच मिश्किल स्वभाव असणारे व्यक्तिमत्व आहे. ओठात एक पोटात एक असला त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या या स्पष्ट बोलण्याचा तोटाच झाल्याचे दिसून येते. मात्र जे आहे ते आहे; ओठात एक पोटात एक असला त्यांचा स्वभाव नाही. काम होत असेल तर होय नाही तर नाही हे असे स्पष्ट बोलणार; उगाच झुलवत ठेवणारा स्वभाव नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे.
असाच काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमा मध्ये अजित पवार यांनी एक वाढदिवसाचा किस्सा सांगितला. अजित दादा म्हणाले ” मी घरी एक खुर्ची कायम रिकामीच ठेवत असतो. एखादा कार्यकर्ता येतो वाढदिवस आहे सांगतो, मग त्याला शेजारीच बसवून फोटो काढून देतो. फक्त त्याचा व्यवसाय चांगला असायला हवा. नाहीतर दारू, मटक्याचा धंदा करणारा असायचा आणि आमची वाट लागायची. वाढदिवस यांचा आणि पंचनामा आमचा” असं व्हायला नको असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचा किस्सा सांगत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
अजितदादा पवार यांचा जितका आक्रमक, शब्दाचा पक्का माणूस असा स्वभाव आहे तितकाच मिश्किल स्वभाव सुद्धा त्याचा आहे. त्यांची भाषणे ही गावाकडच्या बोली भाषेत असतात. त्यांची भाषणे ऐकणारा मोठा खेड्यातील वर्ग आहे हे मात्र निश्चित!