
मोठी बातमी : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट!
देशातील निवडणुकीचे वारे फिरवणारे प्रशांत किशोर राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. प्रशांत किशोर यांना राजकारणामध्ये प्रतिभावंत राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी 2014 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळवून दिले होते. भारतीय जनता पक्षाच्या सर्व यशाच्या पाठीमागे प्रशांत किशोरने आखलेल्या रणनीतीने भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळवून दिले.
आज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. नवी दिल्लीतल्या राहुल यांच्या निवासस्थानी ही भेट सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित आहेत. या चर्चेमध्ये नेमकी काय खलबत होणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी तब्बल तीन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. नेमकं राजकीय गणित सध्या काय आहे आणि प्रशांत किशोर भारताच्या राजकारणामध्ये नेमकं काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.