
मोठी बातमी! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये महाराष्ट्रभर रामधून विविध लोकांनी सक्रिय होत आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलने केली होती त्यावेळी राज्यातील भाजपा सरकारने तथा देवेंद्र फडणीस यांनी गुन्हे दाखल केले होते. राज्यामध्ये सत्तापरिवर्तन होऊ महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारकडे सर्व गुन्हे माफ करण्याची तात्काळ मागणी केली होती.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 3 डिसेंबर 2019मध्ये ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.” असे म्हणाले होते.
आंदोलन केल्यानंतर हिंसक वळण लागले होते त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते याबाबतीत सातत्याने हे गुन्हे मागे घेण्याची मागणी स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. सर्व गोष्टींचा विचार करत महा विकास आघाडी सरकारने ने आज आंदोलका वरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.