Big Breaking : राष्ट्रवादीच्या आमदारावर पुण्यात गोळीबार !

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या वर दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान गोळीबार झाला आहे. हा गोळीबार आ. अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या आवारात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारामध्ये सुदैवाने आ.अण्णा बनसोडे सुखरूप आहेत. अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत गोळीबार करणाऱ्या सदर व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या संशयित व्यक्तीचे नाव तानाजी बनसोडे असल्याची माहिती समोर येत आहे.  

 

दुपारी साडेबारा एक वाजण्याच्या दरम्यान आमदार बनसोडे यांच्या कार्यालयामध्ये संशयित तानाजी पवार आणि त्याच्या सोबत एक सहकारी सहकारी यांच्या कार्यालयात घुसले. हल्लेखोरांनी गेट मधून आत मध्ये गेल्या बरोबर पिस्तुल मधून ३ राऊंड फायर केले. मात्र या हल्ल्यातून आ.बनसोडे सुखरूप असून काळजी करण्याचे कारण नाही.

कार्यालयाच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी गोळीबार करणार्‍या संशयितास चांगलाच मार देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांना घटनास्थळावरून 2 पुंगळया, 10 ते 12 राऊंड, पिस्टल, 2 मॅझीन मिळाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. याच्या पाठीमागे नेमका मास्टर माईंड कोण आहे? तसेच या हल्ल्याच्या मागील काय कारण आहे हे अद्याप समोर आले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.