बोगस मतदानामुळेच भाजपचे ३ आमदार व ६६ नगरसेवक निवडून आले.

0

केंद्रीयमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांच्यावर पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्याचे धाडस दाखविल्यानंतर देशभरात प्रकाशझोतात आलेले शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आता शहरात तब्बल अडीच लाखांपेक्षा अधिक बोगस दुबार मतदार नाव नोंदणीचा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नाशिक महापालिकेच्या मतदारयादीत मोठ्या प्रामणात बोगस मतदार आहेत. त्याचा शोध शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी लावला आहे. या बोगस व दुबार नाव नोंदणीमुळेच भाजपचे ३ आमदार व महापालिकेत ६६ नगरसेवक निवडून आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दुबार मतदार नोंदणी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांनंतर आता पोलिस आयुक्त व राज्य निवडणूक आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करणार आहे. हा सर्व घोटाळा बाहेर काढण्यासाठी शिवसेनेच्या १० जणांचा समावेश असलेल्या पथकाला सलग तीन महिने कठोर परिश्रम घ्यावे लागल्याची बाब यानिमित्ताने समोर आली.

दुबार नावात शासकीय कर्मचाऱ्यांची नावे अधिक आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनी दोन ठिकाणी नावे नोंदवू नयेत आणि ती असल्यास कुठेतरी एकाच ठिकाणी नाव असायला हवी, असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांची दुबार नावे अधिक असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही घबराट आणि संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जी दुबार नावांची यादी सादर केली, ती महापालिका निवडणुकीपूर्वी निश्चितच वगळली जातील, असा विश्वास शिवसेना नेत्यांमधून सध्या व्यक्त होत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.