
‘भावभक्तीचा मळा विठू माझा सावळा ‘ त्याचा तिलक हा आगळावेगळा. भगवान विठ्ठलाचा तिलक असा का आहे?
समस्त महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरचे भगवान पांडुरंग, विठ्ठल. अध्यात्माचा पाया घालताना भक्ती दाटून येते आणि या भक्तीत ‘ बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीवभावे ‘ अशी तनामनाची अवस्था होते. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम उद्योग, व्यवसाय याने युक्त आहे. परंतु महाराष्ट्रात अन्नदाता असणारे आणि स्वताचे शेतशिवार सांभाळणारे असंख्य विठ्ठल भक्त आहेत. शेतात राबून विठ्ठल भक्ती करणारे वारकरी पंढरीची आस वर्षभर धरतात. या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन पंढरपुरात पायी घेतात. सबंध महाराष्ट्रातून पायी चालत, गळ्यात तुळशी माळ घालून, डोक्यावर तुळस घेत मुखात पांडुरंगाचे नामस्मरण जपत ही भक्तांची मांदियाळी कार्तिकी व आषाढी एकादशीला पंढरपूरला जाते. चंद्रभागेच स्नान आणि सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाने या वारकर्यांना वर्षभर जगण्याची उमेद मिळते. याच पांडुरंगाच्या तिलकाची म्हणजेच कपाळावर असणार्या नामाची भक्तिपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
विठ्ठल कपाळावर जो तिलक लावला जातो तो कस्तुरी, चंदनाचा तिलक असrतो. हा तिलक उलटा किंवा पानाच्या आकाराचा वाटतो. हा तिलक लावताना मध्यभागी काळा टिक्का लावला जातो. हा टिक्का म्हणजे बुक्का नसून कृष्ण खोड जे उगाळल्यावर काळे द्रव बाहेर येतो. ते लावले जाते. विठ्ठलाचा हा तिलक पानाच्या आकाराचा का असतो? तर सर्वसाधारणपणे आपण नाम किंवा गोल टिका लावतो, परंतु वारकरी उर्ध्व तिलक व मध्ये काळा ठिपका लावतात जो तुळस काष्ठाचा बुक्का असतो. तर भगवानांनी ४ महारथींना ज्ञान दिलेल असून त्यावरून ४ संप्रदाय पडतात. या चारही संप्रदायांचे अनुयायी वेगवेगळे तिलक लावतात.
१) रूद्र संप्रदाय
२) श्री संप्रदाय
३) कुमार संप्रदाय
४) ब्रह्म, मध्व, गौडीय संप्रदाय
यांपैकी जे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय आहे त्यात भगवान ब्रह्मांला भगवंतांनी ज्ञान दिलेल आहे तर या संप्रदायात उर्ध्व तिलक व त्याखाली तुळशीचे पान असा तिलक काढला जातो या तिलकाला साम्य साधणारा भगवंत पांडुरंगाचा तिलक असतो. विठ्ठलाला अभ्यंग घालताना मुकुट काढला जातो व कपाळावर उर्ध्व तिलक काढला जातो त्यानंतर खाली तुळशीचे पान काढले जाते व मध्यभागी काळा टिक्का व तुळशीचे पान लावले जाते. याप्रकारे पांडुरंगाचा मनाला भावणारा तसेच भक्ती दाटून देवत्वाची प्रचिती देणारा तिलक लावला जातो. माहिती आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा.