भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ च्या एका एपिसोडचे इतक मानधन घेतात. आकडा ऐकून थक्क व्हाल

0

मराठी चित्रपट सृष्टी आणि विनोद हे समीकरण बरीच वर्षे यशस्वी ठरलेले आहे. एकेकाळी द्विअर्थी संवादफेकीन दादा कोंडकेनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. ग्रामीण भागात त्यांचे चित्रपट तुफान हिट ठरले. कालांतराने अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवल. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत निरनिराळे प्रयोग होत असून कथानकानही कात टाकली आहे. ग्लॅमरस, चांगल्या बजेटचे चित्रपट मराठीत होत असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

 

मराठी मालिकाही चांगला प्रतिसाद मिळवत असून यातील कलाकार चांगली लोकप्रियता मिळवताना दिसून येतात. मराठी कॉमेडी शो तर चांगली टी. आर. पी खेचताना दिसून येतात. फू बाई फू या कॉमेडी शोने एकेकाळी धूमाकूळ घातला आणि चला हवा येऊ द्या या शोची निर्मिती झाली. छोटे, छोटे स्कीट आणि हलक, फुलक भाष्य यामुळे विनोदाची ही भट्टी चांगलीच जमलेली आहे. या शोमधील भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, निलेश साबळे धमाल उडवून देतात. मात्र या शोचा नायक आहे भाऊ कदम. सर्वसाधारण रूप असणारे भाऊ कदम प्रेक्षकांत चांगलेच लोकप्रिय आहेत.

थुकरटवाडीचा नायक अशी इमेज असणारे भाऊ कदम उत्तम अभिनेते आहेत. भाऊ कदम यांचा जन्म मुंबईतील असून त्यांचे शिक्षणही मुंबईतच पार पाडले. आतिशय हालाखीच्या परिस्थितीतून भाऊ कदम वर आले आहेत. सुरुवातीला पडेल ते काम भाऊ कदमनी केले आहे. नाटकात १०० रु नाईट असे काम करत भाऊंच १५० ते २५० रुपये इतक वाढल होत. अत्यंत हालाखीतही भाऊ कदमनी जिद्द सोडली नाही आणि अभिनय करत राहिले. फू बाई फू या शोमधून त्यांना ओळख मिळाली आणि त्यांनी मागे वळून पाहील नाही.

भाऊ कदमनी ५०० नाटकात अभिनय केला असून नशिबवान, टाईमपास इ चित्रपटात भूमिका निभावल्या आहेत. चला हवा येऊ द्या हा शो भाऊ कदमांसाठी मैलाचा दगड ठरला. त्यात वेगवेगळी पात्र साकारताना भाऊ प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊंचा निरागस चेहरा आणि खरेपणा प्रेक्षकांना भावतो. भाऊ या शोच्या एका एपिसोडसाठी ८०००० रुपये घेतात. १०० रुपये मानधनापासून सुरुवात करणारे भाऊ कदम आज चांगलच मानधन कमावतात. जिद्द आणि सातत्य राखल्यास यश नक्की मिळत याच उदाहरण म्हणजे भाऊ कदम होय.
मित्रांनो ही माहिती रंजक वाटल्यास आमच्या फेसबुक पेजला जरूर लाईक करा. लेख जरूर शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.