
Bhandara Hospital Fire Incident: जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर आगीला महिना
महिन्याभरापूर्वी भंडारा जिल्ह्यात रूग्णालयात लागलेल्या आगीमध्ये (Bhandara Hospital Fire Incident) 10 बालकांचा जीव गेला होता. या जळीत कांडाला माहिना उलटला असला तरीही त्याचा फॉरेंसिक सायन्स लॅब (Forensic Science Laboratory) चा रिपोर्ट मात्र अद्याप प्रतिक्षेमध्ये आहे. पोलिसांनी काही प्रश्नांसह फॉरेंसिक सायन्स लॅब रिपोर्ट पुन्हा त्यांच्याकडे पाठवून लवकरात लवकर त्याची पूर्तता करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.