भगरे गुरुजींची मुलगी आहे अभिनेत्री या लोकप्रिय मालिकेत करतेय भूमिका

0

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम राम राम महाराष्ट्र यात धार्मिक तसेच ज्योतिष विशद करणार्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि ज्योतिष तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक भगरे गुरुजी महाराष्ट्राची सकाळ प्रसन्न करत असतात. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांचे गुरुकुलमध्ये शिक्षण झाले आहे. ज्योतिष आणि वेदशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. सध्या ते झी मराठीवर घेतला वसा टाकू नको या मालिकेत हिंदू व्रत वैकल्यांच्या कथा विशद करत असतात. मित्रांनो याच भगरे गुरुजींची मुलगी आहे अभिनेत्री. चला जाणून घेऊया तिच्याबद्दल.

पंडीत अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांचे नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथे स्वताच्या नावे प्रतिष्ठान आहे. तर याच गुरुजींची मुलगी अनघा अतुल भगरे ही अभिनेत्री असून ती सध्या रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत श्वेताची भूमिका करत आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका असून अनेक समाजकार्यातही त्या अग्रेसर असतात. आईलाही कलाक्षेत्राची आवड असल्याने त्यांनी अनघाला लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. अनघाने नाशिक येथून शालेय शिक्षण पूर्ण केले तर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून कम्युनिकेशनची पदवी मिळवली आहे. अनन्या नावाचे नाटकही तिने केलेले आहे. कुलकर्णी वर्सेस कुलकर्णी, व्हाॅटस् अप लग्न अशा चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

कोठारे व्हीजनमध्ये पीआर ब्रँड मॅनेजर हे पदही तिने सांभाळले आहे. अनघाने कम्युनिकेशनची पदवी घेतल्याने ती या क्षेत्राशी संबंधित कॅमेरामागे काम करत होती. सर्वसामान्य चेहरा असलेल्या अनघाने निरमाची जाहिरातही केलेली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत ग्रे शेड असणारी भूमिका अनघा करत असून प्रेक्षकांनाही ती आवडत आहे. भगरे गुरुजींची कन्या या तिच्या ओळखीबरोबरच एक अभिनेत्री अशी तिची ओळख घराघरांत होत आहे. अनघा म्हणते, “मी स्वताला खूप लकी समजते कारण मला लवकर संधी मिळाल्या. आणि चांगली लोकही भेटत गेली. भगरे गुरुजीच्या कन्येला प्राईम महाराष्ट्र टिमकडून शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.