शिवसेनेशी गद्दारी खपवून घेतली जाणार नाही : आ.संतोष बांगर

0

शिवसेना पक्षाने कित्येक सर्वसामान्य माणसाला राज्यात न्याय देण्याचे काम केले. जे भगव्याशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या आयुष्याची चांदी करण्याचा प्रयत्न हा सेनेने केलेला आहे. कित्येक सामान्य कुटुंबातील माणसांना आमदार केले, कित्येकांना इतर ठिकाणी निवडून आणले.

“जे शिवसेनेच्या बळावर मोठे झाले त्यांची आज परिस्थिती काय आहे. पक्षात गटबाजी नको. शिवसेनेशी गद्दारी कदापी खपवून घेतली जाणार नाही”. असा स्पष्ट शब्दांत इशारा जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर यांनी वसमत येथे तालुका संपर्क कार्यालय उदघाटनप्रसंगी दिला आहे.

तसेच पुढे आ.संतोष बांगर म्हणाले की, जनतेशी नाते जोडा त्यांची कामे करा. त्याचे फळ आज ना उद्या तुम्हाला नक्की मिळेल. शिवसेनेशी अनेक गद्दार झाले त्यांची दशा आज काय आहे असेही त्यांनी सांगितले. स्वतः चे उदाहरण देत ते म्हणाले की पक्षाशी एकनिष्ठ राहा. मी एकनिष्ठेने नगरसेवक, जिल्हा प्रमुख ते आज आमदार झालाे आहे.

कोरोना काळात स्वत:ची एफडी मोडून रुग्णांसाठी ९० लाख रुपये दिले त्यांनी दिले होते. त्यांच्या कार्याचे कौतुक उभ्या महाराष्ट्रात झालेले पाहायला मिळाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.