
अनाथांची माय होऊन; तत्काळ विषय मार्गी लावणार!
अनाथ मुलांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली आहे. अनाथ मुलांचे १८ वय झाल्याच्या नंतर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांच्या बाबतीत त्यांनी संवाद महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संवाद साधला.
एबीपी माझाच्या अनाथ मुलांच्या स्टोरी ची तत्काळ दखल घेत त्यांनी अनाथ मुलांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेत त्यांनी सांगितले आहे की महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करेल.
"एबीपी माझा "च्या बातमीची दखल घेऊन मी स्वतः याबाबत महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत बोलले आहे. या मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करेल.प्रामुख्याने या मुलांच्या 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या समस्यांबाबत काय उपाययोजना करता येतील https://t.co/ikllBKMwOZ
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 22, 2021
अनाथ मुलांच्या लॉकडाऊन काळातील जीवन संघर्ष हा वाढत चालला आहे. १८ वर्षाच्या पुढील प्रवास अशा परिस्थिती मध्ये खडतर ठरतो आहे. मुलांना १८ वर्ष झालं की हॉस्टेल सोडावे लागते; मात्र अशा अडचणीच्या काळात रुपाली चाकणकर माय होऊन अनाथांच्या साठी धावत आल्या आहेत ही समाधानाची बाब आहे.